महापरिनिर्वाण दिन भाषण
संविधानाचे जनक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. दरवर्षी बाबासाहेबांच्या पुण्यतिथीचा हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदा बाबासाहेब आंबेडकर यांचा 67 वा महापरिनिर्वाण दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक शाळा-कॉलेजेसमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या निमित्ताने एक छानसे छोटेसे भाषण तुमच्यासाठी....
भाषण - सन्माननीय व्यासपीठ, प्रमुख अतिथी, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो ...
भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म 16 एप्रिल ई. स. 1891 रोजी मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. भीमराव यांचे प्राथमिक शिक्षण दापोली व सातारा येथे झाले. 1907 मध्ये त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन स्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून 1915 साली एमए तर 1916 साली पीएचडी पदवी प्राप्त केली. हिंदू कोड बिल, स्त्री शिक्षण, स्त्रियांचे मूलभूत हक्क, अस्पृश्यता निवारण, जातीभेद निवारण, उच्च - नीच भेदभाव, महाड येथील चवदाळ तळ्याचा सत्याग्रह असे अनेक महान करी त्यांनी केली.
हे पण वाचा
आपला भारत देश स्वतंत्र झाल्यावर आपल्या देशाची राज्यघटना तयार करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विविध देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून मसुदा तयार केला. त्यासाठी त्यांना 2 वर्ष 11 महिने 17 दिवसांचा कालावधी लागला. त्यांच्या अथक परिश्रमाने समता, बंधुता, आणि मानवतेवर आधारित भारतीय संविधान तयार केले आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची यामध्ये महत्वाची भूमिका होती म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार किंवा जनक म्हणतात.
डॉ. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोंबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो लोकांच्या उपस्थितीत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. दुर्दैवाने 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे दिल्ली येथील निवासस्थानी निधन झाले तो दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो.
शेवटी जाता जाता एकच सांगेल
मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तत्वाची
तू जगाला शिकविली व्याख्या माणसातल्या माणुसकीची ...
तू देव नव्हतास, देवदुतही नव्हतास
तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास.
जय हिंद ...
जय भारत..
अधिक माहितीसाठी तुम्ही खालील व्हिडिओ पाहू शकता 👇
0 टिप्पण्या